चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पाथर्डीतील खळबळजनक घटना
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी पहाटे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कात्रीने मारून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. राणी सतीश खेडकर (वय – 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून, तिचा पती सतीश भास्कर खेडकर (वय – 33) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी सतीश खेडकर याने घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा खून केल्याची घटना राहत्या घरी घडली. खून केल्यानंतर सतीश खेडकर स्वतः पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर होत त्याने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खेडकर दाम्पत्याला सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे व पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. मृत राणीचे वडील सुखदेव ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List