कोंढव्यातील मुस्लिम तरुणीचे पाकिस्तानप्रेम, सोशल मीडियावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची पोस्ट
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, सोशल मीडियावरही आता पाकड्यांच्या समर्थनार्थ चक्क तरुणीने पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर व्हायरल केली होती. याप्रकरणी संबंधित तरुणी खतिजा शहाबुद्दीन शेख (वय – 19) हिच्याविरुद्ध बीएनएस 152, 196, 197, 299, 352,353 कलामानुसार गुन्हा दाखल करीत तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित युवतीने सोशल मीडिया अकाउंटवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा स्वरूपाची पोस्ट केल्याने खळबळ उडाली असून, तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करीत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात राष्ट्रद्रोहासारख्या गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून, पोलीस तपास करीत आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणावर लक्ष ठेवून असून, सोशल मीडियावर देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियाद्वारे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तिला अटकदेखील करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे.
– डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त, झोन-2
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List