कुख्यात डॉनकडून माधुरी दीक्षितला जीवे मारण्याचा प्रयत्न, ‘धकधक गर्ल’ने दुबई जाण्यास नकार दिल्यानंतर…
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आल्यानंतर आजही मन विचलित होतं. झगमगत्या विश्वात एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक कुख्यात गुंडानी अभिनेत्रींवर दबाव टाकत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. असंच काही अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत देखील झालं. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये माधुरीचा बोलबाला होता. फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील माधुरीची क्रेझ होती आणि हीच क्रेझ पाहता पाहता अंडरवर्ल्डपर्यंत देखील पोहोचली. अंडरवर्ल्ड डॉन अनीस इब्राहिम याची नजर माधुरीवर पडली आणि अभिनेत्रीला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा अनीस इब्राहिमचा प्रयत्न सुरु झाला.
सांगायचं झालं तर वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. अनीस इब्राहिम स्वतःच्या अय्याशीसाठी अनेक अभिनेत्रींना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा. त्याने माधुरी दीक्षित हिला देखील स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्यासाठी त्याने अनेक मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं. माधुरीला अनेकदा महागडे गिफ्ट्स पाठवले. दुबईत अभिनेत्रीला बोलावलं. पण अनीस इब्राहिमचे सर्व प्रयत्न फसले.
दीक्षित म्हणाले, ‘पोलीस अधिकार अविनाश धर्माधिकारी यांनी मला ही घटना सांगितली होती. पाहायला गेलं तर त्यांनी एका प्रकारे माधुरीचे प्राण वाचवले आहेत. माधुरीवर अनीस इब्राहिम वाईट प्रकारे दबाव टाकत होता. चुकीच्या उद्देशाने तो माधुरीला दुबईत बोलावत होता. अनेक अभिनेत्रींना तो दुबईत बोलवायचा. त्यांच्यासोबत नको ते करायचा… त्याची नजर माधुरीवर देखील होती.’
‘माधुरीने कायम दुबई जाण्यासाठी नकार दिला. यामुळे अनीस इब्राहिम प्रचंड नाराज झाला आणि त्याने अभिनेत्रीला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि माधुरीच्या सुरक्षेची काळजी पोलिसांनी घेतली. त्यानंतर माधुरीने देखील अनेक वर्षांसाठी भारत देश सोडला. हे एक मोठं संकट होतं. पण माधुरीने स्वतःचं रक्षण केलं पण अनीस इब्राहिमच्या जाळ्यात अडकली नाही किंवा त्याला कधी भेटली नाही…’ असं देखील जितेंद्र दीक्षित म्हणाले.
कोण होता अनीस इब्राहिम?
अनीस इब्राहिम याच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. अनीस इब्राहिम हा दाऊद इब्राहिमचा भाऊ होता. जो ड्रग्स तस्करी विश्वात सक्रिय होता. 90 च्या दशकात दाऊद इब्राहिमची बॉलिवूडमध्ये दहशत होती. ज्यामुळे अनेक कलाकारांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List