तामिळनाडूमध्ये सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, चित्रपट का बनला वादाचा मुद्दा?

तामिळनाडूमध्ये सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, चित्रपट का बनला वादाचा मुद्दा?

सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सनीने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावलं आहे. पण आता हा चित्रपट अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या चित्रपटाविरोधात तामिळनाडूमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. वायको यांच्या नेतृत्वाखालील एमडीएमकेने रविवारी मागणी केली की नुकताच प्रदर्शित झालेला सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपटावर तामिळनाडूमध्ये बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारण चित्रपटात इलम तमिळ “स्वातंत्र्य चळवळ” आणि एलटीटीईचे “दुर्भावनापूर्ण चित्रण” केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद 

एमडीएमकेमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे वायको यांचे पुत्र दुराई वायको यांनी पक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी झालेल्या पक्षाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पक्षाच्या सूत्रांनी मौन बाळगले असले तरी, काही वृत्तांचा असा दावा आहे की बहुसंख्य सदस्यांना दुराई यांनी मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कड़गम (एमडीएमके) चे सरचिटणीस म्हणून काम करावे अशी इच्छा होती.

LTTE च्या सदस्यांना क्रूर दहशतवादी म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप 

पक्षाने अनेक ठराव मंजूर केले, ज्यात राज्यपाल आर.एन. रवी यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारा एक ठराव पारित करण्यात आला होता. ‘जाट’ चित्रपटाचा संदर्भ देत, ठरावात म्हटले आहे की, या चित्रपटात इलम तमिळ स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करणारे दृश्ये आहेत. तसेच चित्रपटात LTTE च्या सदस्यांना क्रूर दहशतवादी म्हणून दाखवण्यात आले आहे ज्यांनी तमिळ इलमसाठी आपले प्राण अर्पण केले.

चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी

चित्रपटाच्या पटकथेत अशा संदर्भाची आवश्यकता नसल्याचा दावा करून, तमिळ समर्थक एमडीएमकेने आरोप केला की चित्रपटात “स्वातंत्र्यसैनिक आणि सेनापतींना” खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे जे निंदनीय आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जाटवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता सनी देओलचा जाट चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल
साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून म्हणजे सध्या प्रत्येकाच्या मनात घर केलेला ‘पुष्पा’. पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुनचे प्रत्येक पात्र त्याच्या अ‍ॅटिट्यूडसाठी...
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? लेटेस्ट लूक पाहून चाहते म्हणाले “ही ऐश्वर्या रायच”
इंडियन आयडल 12 विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
कॉमेडियन समय रैनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचे समन्स; दिव्यांग व्यक्तींबाबत असंवेदनशील वक्तव्य भोवणार
बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी – केंद्र सरकारने राज्यांना दिले मॉक ड्रिलचे आदेश, नागरिकांना ‘या’ गोष्टींचे दिले जाणार ट्रेनिंग
LIVE : पहलगामच्या बदल्यासाठी सज्ज… दिल्लीत घडामोडींना वेग, NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला