आणखी एका गर्भवतीचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा घेराव
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवीमुंबईतही अशीच घटना घडली आहे. तुर्भे येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या संगिता खरात यांचा नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्देवी मृत्य झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या महिलेला प्रसुती होऊन कन्यारत्न झाले, मात्र प्रसुतीच्या वेळी डॉक्टरच्या चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
संगिता खरात यांची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली असल्याने त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयातून बाजूच्या खाजगी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी देखील जवळपास अडीच लाख बिल झाले आहे.या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी नवा मुंबई महापालिका प्रशासन आणि डॉक्टरांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक राजेंद्र इंगळे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. नवी मुंबई महापालिका रुग्णालयात मयत संगीता खरात यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.
पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या ताजे असून या प्रकरणात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ससून रुग्णालयाच्या फेर चौकशी अहवालात घैसास यांनी हलगर्जीचा केल्याचा ठपका ठेवला होता.रुग्ण तनिषा भिसे यांच्या नातलंगाकडे दाखल करण्यासाठी २० लाखाचे डिपॉझिट मागितले होते. पैसे वेळेत न भरल्याने या महिलेला दोन चार तास तिष्ठत ठेवले होते. त्यामुळे अखेर अन्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात बराच कालावधी गेल्याने जुळ्या मुलींना जन्मानंतर प्रकृती ढासळून तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List