मुंबईतील तोडलेल्या जैन मंदिरात समाज बांधवांकडून पूजा…मंदिर पुन्हा बांधण्याचा निर्धार
मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर १६ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. हे मंदिर महापालिकेने पाडले होते. त्यानंतर देशभरातील जैन समुदायाकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात शनिवारी जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली. जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मनपा अधिकारी नवनाथ घाडगे यांचे निलंबन केले आहे. दरम्यान, जैन समाजाने मंदिराची जी जागा राहिली आहे त्या जागेवर पूजा अर्चा सुरु केली आहे.
जैन समाजाने शनिवारी रॅली काढली. जैन समाजाचा विरोधानंतर मुंबई मनपाने त्या ठिकाणी असलेले ढिगारे दूर केले आहेत. त्यानंतर रविवारी तुटलेल्या मंदिरात पूजा पाठ सुरु केला. मंदिराच्या सर्व भिंती तुटल्या आहेत. मंदिराला दरवाजेसुद्धा नाहीत. त्यानंतर जैन बांधवांनी त्या ठिकाणी पूजा सुरु केली आहे. महिलांनीही सकाळी येऊन पूजा केली. भगवान महावीर यांच्यासमोर भाविक नतमस्तक होत आहे. मंदिर तोडल्याचा संताप भाविकांमध्ये आहे. डोळ्यात आश्रू आहे. मंदिराच्या पुजारींनी म्हटले की, हा आमचा खूप मोठा विजय आहे. जोपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. ज्यांनी मंदिर तोडले त्यांना कोणी माफ करणार नाही.
बीएमसीने मंदिर पाडण्यासाठी नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी मंदिर पाडण्यात आले. त्यामुळे जैन समाज आणि स्थानिक नेते संतप्त झाले.
मंदिर तोडल्याच्या निषधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. सर्वांनी काळी पट्टी बांधून बीएमसीचा विरोध केला होता. मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत जैन समाजाची शनिवारी दोन तास बैठक चालली. त्यावेळी समाजाकडून एक निवेदन देण्यात आले. रेस्टॉरंट मालकाच्या सांगण्यावरुन मंदिर तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. मंदिर तोडल्यानंतर जैन समाजाचे लोक त्या ठिकाणी पोहचले आणि मूर्ती एका चबुतरावर ठेऊन पूजा केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List