समांथा मिस्ट्री बॉयसोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात, कोण आहे तो?
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रूथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त, ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही लोकांचे लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी समांथाच्या पूर्व पती अभिनेता नागाचैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले. आता समांथा तिच्या लव्ह अफेअरमुळे ती चर्चेत आली आहे. समांथा कोणाला तरी डेट करत असल्याचे म्हटले आहे. आता हा मिस्ट्रीबॉय समांथासोबत तिरुपती बालाजी मंदिरात गेली होती. तेथील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हा मिस्ट्री बॉय कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथाने शनिवारी (१९ एप्रिल) तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी समांथासोबत चित्रपट निर्माते राज निदिमोरू देखील होते. त्यांच्या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही मंदिर परिसरात पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. १९ एप्रिल रोजी, ‘कुशी’ अभिनेत्री राज निदिमोरूसोबत पारंपारिक पोशाखात दिसली आणि तो क्षण पापाराझींनी शेअर केला आहे. एका क्लिपमध्ये, दोघे एकत्र मंदिरात प्रवेश करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये समांथा कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. एका वेगळ्या व्हिडीओमध्ये, समांथा इतर अनेकांसह मंदिरात प्रवेश करताना दाखवण्यात आली आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
समांथा किंवा राज निदिमोरू यांनी त्यांच्या डेटिंगच्या अफवांबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, त्यांचे चाहते बऱ्याच काळापासून अंदाज लावत आहेत. समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांच्यात गेल्या काही काळापासून डेटिंगच्या अफवा पसरत आहेत, परंतु दोघांपैकी कोणीही या अफवांना दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. समांथा अनेकदा मंदिरात जाऊन आर्शीवाद घेताना दिसते.
या अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबत ‘सिटाडेल: हनी बनी’ (२०२४) आणि ‘द फॅमिली मॅन २’ (२०२१) या दोन प्रकल्पांवर आधीच काम केले आहे. ‘रॅक्ट युनिव्हर्स: द ब्लडी किंगडम’ नावाची त्यांची पुढील नेटफ्लिक्स मालिका देखील दिग्दर्शकाकडे आहे. समांथा शेवटची सिटाडेल: हनी बनीमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवनची सह-अभिनय होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List