बोगस मतदारांची आता खैर नाही, मतदार यादीत नाही होणार गडबड! महाराष्ट्रातून तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर निवडणूक आयोगाची मोठी ॲक्शन

बोगस मतदारांची आता खैर नाही, मतदार यादीत नाही होणार गडबड! महाराष्ट्रातून तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर निवडणूक आयोगाची मोठी ॲक्शन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमसह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी रान माजवले. ईव्हीएममध्ये गडबड केल्याप्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणात आता निवडणूक आयोगाने मोठी ॲक्शन घेतली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बदल करण्यात येणार आहे.

काय होती अडचण?

निवडणूक आयोगाकडे निवडणूक काळात अनेक तक्रारी येतात. या समस्या शोधण्यासाठी मतदार केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करणे, मतदाना दरम्यान ईव्हीएमची व्यवस्था, देखभाल करणे. मॉक पोल, मतदानाचा टक्का याविषयीच्या ज्या तक्रारी करण्यात येणार त्याची इत्यंभूत माहिती घेऊन ती सोडवण्यात येईल. मतदान केंद्र अधिकारी आणि मतदान केंद्र एजंट यांना यासाठी लागलीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या मते, निवडणुकीसंबंधीत प्रत्येक प्रक्रियेसाठी एक निश्चित नियम आहे. निवडणुकीदरम्यान त्यात एखादी गडबड असेल तर त्यासाठी नियमांच्या पायऱ्यांचे पालन करणे आवश्यक आहे. काही किरकोळ तक्रारी असतात. काही चुका होतात. या तांत्रिक चुका असतात, त्या मुद्दाम केल्या जात नाही तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने त्या चुका होतात. त्याविषयी आता प्रशिक्षण देण्यात येईल.

50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

या तक्रारी आणि त्रुटीच्या अनुषंगाने मतदार केंद्र अधिकारी आणि एजंट यांना प्रशिक्षण सुरू रण्यात आल्या आहे. त्यात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चूका समोर आल्या आहेत. इतकेच नाही तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा निवडणूक नियम आणि प्रक्रियेसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मतदार केंद्रावर काम करणाऱ्या 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदार यादीतील त्रुटी दूर करणार

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. मतदार यादी अपडेट करण्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्र निहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे. त्याआधारे बोगस मतदार ओळखले जातील. मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येईल. स्थानिक मतदार केंद्र, जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर छाननी झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.

महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी

मतदार यादीत गडबड असल्याच्या अनेक तक्रारी देशभरातून करण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातून करण्यात आल्या होत्या. देशभरातून 89 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या सर्व महाराष्ट्रातील होत्या. तर इतर राज्यातील तक्रारी किरकोळ होत्या. आता या तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यावर उपाय करण्यात येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जम्मूत लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 3 जवानांचा मृत्यू जम्मूत लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 3 जवानांचा मृत्यू
कश्मीरमधील रामबनमध्ये राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला. हा ट्रक तब्बल 600 फूट खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू...
हार मानायची नाही…! मुलगा दहावीत सर्व विषयांत नापास होऊनही पालकांकडून जंगी पार्टी
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली, दोघांचा मृत्यू
जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे