राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का?; अजितदादांनी असं दिलं उत्तर
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट घडणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या शुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटल्याने पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र येतात का ? याविषयी आज दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा झडू लागल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
सातारा येथील फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज आम्ही पिंपोडे गावात आज शेतकरी मेळावा घेतला होता.गेल्या शंभर दिवसांमध्ये आमच्या सरकारने काय काम केले आणि पुढील उद्दिष्ट काय आहे. याविषयी मेळाव्यात चर्चा करण्यात आली आहे. यानंतर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडके यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजितदादांनी हजेरी लावली. त्यानंतर मी उंडाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची परंपरा ही अशीच अखंड अबाधित बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीन पाटील यांनी ठेवली आहे. याबाबत मी समाधान व्यक्त केलं. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून या बँकेच्या निगडित काही प्रश्न असतील ते सोडवणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरे यांचा समेट
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयी अजित पवार यांना विचारता ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच कुटुंबातील आहे, त्यांनी काय करावे हे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये आपण काय करणार.? यामध्ये पत्रकारांना काय त्रास आहे ? दोघेही पक्ष चालवतात, याबाबत दोघांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. दोघांनी एकत्र यावं यावर कोणी राजकीय पक्षांनी बोलण्याचं कारण नाही असेही अजित पवार यांनी सांगितले. माझं एकच मत आहे, सद्सद विवेकबुद्धीला पटेल असे दोघांनी निर्णय घ्यावेत असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करु नका
अजित पवार पुढे म्हणाले की रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला फोन करून सांगितले त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही. असा मला येता येणार नसल्याचा निरोप त्यांनी दिला आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची काळजी तुम्ही पत्रकारांनी करू नये आणि तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या असा टोलाही अजितदादांनी यावेळी लगावला.
सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लागो
जनतेचा पाठिंबा असेल तर आमचा राष्ट्रवादी नक्कीच वाढेल. या पुढील काळात देखील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीबाबत देखील सर्वजण डोळे लावून बसले आहेत, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे. हा निकाल लागला तर आम्हाला पण निवडून आलेली ही टीम मदतीला मिळते असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List