साडे आठ कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण, तुळजाभवानी संस्थानाच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

साडे आठ कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण, तुळजाभवानी संस्थानाच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर संस्थानमधील 1991 ते 2009 या काळात झालेल्या आठ कोटी 43 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अहवालानुसार तत्कालीन विश्वस्त व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दिले आहेत.

याचिकेनुसार तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये 1991 ते 2009 या कालावधीत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच सहधर्मादाय आयुक्तांनी 2010 मध्ये काही आदेशही दिलेले होते. त्यात दानपेटीची लिलाव पद्धत बंद करण्याचेही निर्देश होते. दरम्यान 2015 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्याच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सरकारने सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्यात यावेत अशा आशयाचे आदेशही दिले होते.

मात्र, या प्रकरणी पुढे काय झाले, अशी विचारणा करणारी एक जनहित याचिका हिंदू जनजागृतीच्या वतीने अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी यांनी दाखल केली. या याचिकेवर ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांनी त्यांची खंडपीठात बाजू मांडली. सुनावणीवेळी संबंधित प्रकरणात चौकशीनंतर सीआयडीने 27 ऑक्टोबर 2017 रोजी शासनाला 8.43 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अहवाल सोपवला आहे. संबंधित अहवाल हा सांख्यिकी अधिकारी व लेखापरिक्षणाच्या आधारे असल्याचे नमूद असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले. या प्रकरणाचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने तत्कालीन विश्वस्तांवर सीआयडीच्या अहवालानुसार गुन्हे दाखल करावेत व तपास सीआयडीच्या अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांमार्फत करावा, अशा आशयाचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे, सरकारकडून महेंद्र निर्लेकर तर विश्वस्तांकडून सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलंय...
‘सैराट’मधील इनामदार वाडा आला पाण्याबाहेर, पर्यटकांची गर्दी वाढली; वाड्याबाबतचं रहस्य काय ?
यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाच्या नावाचा अर्थ खूपच खास
श्वेता तिवारी, पलक तिवारी यांचं शिक्षण जाणून व्हाल हैराण, कमावतात कोट्यवधींची माया
मतदान न करणाऱ्यांना ‘अशी’ सभ्य वागणूक द्या; प्राजक्ता माळीच्या पोस्टने लक्ष वेधलं
गोविंदाच्या भाचीचे मोठे विधान, रागिनी थेट म्हणाली, मामाने स्वत:च्या मुलासाठी..
सलमान खानचे आई वडील पोहचले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास फोटो व्हायरल