मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं
घरी मोठ्या मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती. सर्व आनंदात होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला अन् लग्नघर शोकसागरात बुडालं. घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. घरातून धूर निघताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
गुजरातमधील गोधरा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बामरौली रोडवरील वृंदावन 2 सोसायटीत दोषी कुटुंब राहत होते. शेजाऱ्यांनी दोषी यांच्या घरातून धूर येताना पाहिला. त्यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा तोडला. घराच्या पती-पत्नी आणि दोन मुलं बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे. तपासाअंती आगीचे कारण कळेल. काही दिवसातच दोषी यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होणार होता. परंतु तत्पूर्वीच संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List