कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू
पाकिस्तानातील कराचीच्या तुरुंगात एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याचे नाव समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वीच या मच्छीमाराचा शिक्षेचा कालावधी संपला होता. तरीही त्याची सुटका करण्यात आली नव्हती. पाकिस्तानी सरकारने हिंदुस्थानी मच्छीमारांना तुरुंगात खितपत ठेवल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानी तुरुंगात आतापर्यंत 199 हिंदुस्थानी मच्छीमार कैदी असून त्यात महाराष्ट्रातील 19 मच्छीमारांचा समावेश आहे.
मासेमारी करताना हिंदुस्थानच्या सागरी हद्दीतील मच्छीमार चुकून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करतात तेव्हा त्यांना लगेच ताब्यात घेतले जाते. मंगळवारी एका हिंदुस्थानी मच्छीमाराला कराचीच्या तुरुंगात आपला जीव गमवावा लागला. या मच्छीमाराच्या निधनाची माहिती पाकिस्तान-इंडिया डेमोक्रेसी पीपल फोरमचे माजी पदाधिकारी जतीन देसाई यांनी दिली असून मच्छीमाराचे नाव अजूनही पुढे आलेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List