ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव आणण्याची तयारी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर चुकीच्या पद्धतीने एसआयआर लागू करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. यातच बिहारमध्ये भाजपने निवडणूक आयोगाशी संगमात करून मोठ्या प्रमाणात मतचोरी करून विजय मिळवला, असा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हवण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
इंडिया आघाडी महाभियोग प्रस्ताव आणणार?
इंडिया आघाडी येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणू शकते, अशी चर्चा आहे. दरम्यान, निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी पक्षाशी संगनमत करून एसआयआर प्रक्रियेपासून ते मतदार यादीतील फेरफारपर्यंत, अवघ्या ४५ दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यापर्यंत, सत्ताधारी पक्षाची बाजू घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, असा आरोप आहे. याचविरोधात आता इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List