ब्राझीलमध्ये COP30 च्या मुख्य ठिकाणी भीषण आग, 10 हून अधिक जण जखमी
ब्राझीलमधील बेलेम शहरात गुरुवारी संयुक्त राष्ट्रांची COP30 हवामान परिषदेच्या मुख्य ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 13 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेनंतर सदर परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. घटनेवेळी हिंदुस्थानचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव प्रतिनिधी मंडळासोबत ब्लू झोनमध्ये होते, परंतु ते आणि इतर अधिकारी सुरक्षितपणे बाहेर निघून गेले. मायक्रोव्हेवमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. धुरामुळे श्वास गुदमरल्याने 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना योग्य वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे, असे ब्राझीलच्या पर्यटन मंत्र्यांनी सांगितले. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस घटनास्थळी उपस्थित होते. सुरक्षा पथकाने त्यांना तात्काळ बाहेर काढले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List