अमेरिकी सरकारचा 800 पानांचा धक्कादायक अहवाल, पहलगाम हल्ला बंडखोरांचा दहशतवाद्यांचा नव्हे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची सरशी…

अमेरिकी सरकारचा 800 पानांचा धक्कादायक अहवाल, पहलगाम हल्ला बंडखोरांचा दहशतवाद्यांचा नव्हे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची सरशी…

‘पहलगाममधील पर्यटकांवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला नव्हता, तर तो बंडखोरांनी केलेला हल्ला होता व त्यानंतर हिंदुस्थानने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानची सरशी झाली,’ असा दावा अमेरिकी सरकारच्या अहवालात करण्यात आला आहे.

यूएस-चायना इकॉनॉमिक अॅण्ड सिक्युरिटी रिह्यू कमिशन (यूएससीसी) ने हा 800 पानी अहवाल अमेरिकी काँग्रेसकडे सादर केला आहे. अमेरिका व चीनच्या आर्थिक व संरक्षणविषयक बाबींचा आढावा घेऊन अमेरिकेच्या संसदेला सल्ला देण्याचे काम हा आयोग करतो. त्यामुळे हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचे बळी घेणारा हल्ला हा दहशतवाद्यांनी केला नव्हता, तर तो देशांतर्गत बंडखोरांनी केलेला होता, असे अहवालात म्हटले आहे.

राफेल विरुद्ध फेक नरेटिव्ह

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनने अपप्रचाराची राळ उडवून दिली. फ्रान्सच्या राफेल विमानांपेक्षा आपली जे-35 ही लढाऊ विमाने कशी चांगली आहेत हे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने चिनी शस्त्रे वापरून हिंदुस्थानचे फायटर जेट्स कसे उद्ध्वस्त केले हे पटवून देण्यासाठी चीनने ‘एआय’चा वापर करून विमानांचे ढिगारे दाखवले.

केंद्राच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह

हिंदुस्थानने पाकिस्तानला धडा शिकवला असा दावा केंद्र सरकार व अधिकाऱयांकडून केला गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हिंदुस्थानने आपली ताकद दाखवली आणि पाकिस्तानला काही तासांत गुडघ्यावर आणले, असे खुद्द पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसचा सरकारवर हल्ला

‘अमेरिकी आयोगाचा अहवाल हा आपल्या कूटनीतीला आणखी एक मोठा झटका आहे. आपले पंतप्रधान व परराष्ट्र मंत्रालय या अहवालावर आक्षेप कधी घेणार? या अहवालाचा निषेध कधी नोंदवणार, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केला.

चीनने डाव साधला!

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये झालेल्या छोटेखानी युद्धाचा चीन या धूर्त शेजारी देशाने मोठा फायदा उचलला. या युद्धात चीनने पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत केली. पाकिस्तानने प्रथमच हे संपूर्ण युद्ध चिनी शस्त्रांच्या मदतीने लढले. चिनी लढाऊ विमानांचा वापर केला. याद्वारे चीनने लष्करी क्षमतेची एकप्रकारे चाचणी करून घेतली, असे अहवालात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत! उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत! उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
‘सत्ताधारी एकमेकाच्या नसा आवळत आहेत. आजच बातम्या आल्यात एक कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत’, अशा शब्दांत शिवसेना...
मोदींनी केला होता ट्रम्प यांना फोन – आमचं काम झालंय, आता युद्ध करणार नाही! अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप, भक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गोची रे गोची
मिंधे गटात खदखद आणि कमळाबाईशी गडबड-बडबड, मिंधेंची अमित शहा यांच्या भेटीनंतर नेत्यांची भाषा काहीशी बदलली
पुण्यातील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुठे समिती स्थापन केलीच नव्हती, महसूलमंत्री बावनकुळे यांचा धक्कादायक खुलासा
विधेयकावर निर्णय घ्या, परत पाठवा किंवा राष्ट्रपतींकडे पाठवा हेच राज्यपालांसमोर 3 पर्याय, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय
अमेरिकी सरकारचा 800 पानांचा धक्कादायक अहवाल, पहलगाम हल्ला बंडखोरांचा दहशतवाद्यांचा नव्हे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची सरशी…
प्रदूषणकारी बांधकामे रोखणार, हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष… प्रत्येक वॉर्डात भरारी पथक