बाहुबली फेम अभिनेत्याने लाॅंच केला अल्कोहोलचा ब्रॅंड, 750 मिली टकीलाची किंमत जाणून हैराण व्हाल, वाचा
बाहुबली चित्रपटातील राणा दग्गुबती हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु राणा हा केवळ चित्रपटांपुरता मर्यादीत राहिला नाही. तर त्याने कायमच चित्रपटांव्यतिरीक्त इतर अनेक गोष्टींमध्येही तो रस घेतो. नुकतेच त्याने एक नवीन अल्कोबेव्ह ब्रँड लाँच केला आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हे राणासोबत या ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. हा ब्रँड अद्याप हिंदुस्थानात लाॅंच झालेला नाही. परंतु याची किंमत ऐकून मात्र आपल्याला नक्कीच भोवळ येईल. त्यांच्या ब्रँडच्या 750 मिली टकीलाची किंमत हिंदुस्थानी ड्युटी-फ्री दुकानांमध्ये सुमारे 5 ते 7 हजार रुपये इतकी आहे.
राणा आणि अनिरुद्धच्या टकीला ब्रँडचे नाव, लोका लोका, हे स्पॅनिश आणि संस्कृतचे मिश्रण आहे. त्यांच्या वेबसाइटनुसार, “लोका” चा अर्थ स्पॅनिशमध्ये “वेडा” आणि “लोका” चा अर्थ संस्कृतमध्ये “जग” असा होतो. सध्या त्यांचे उत्पादन मूळतः मेक्सिकोमध्ये उत्पादित केले जाते आणि हिंदुस्थानात उत्पादित केले जाते.
राणा दग्गुबती आणि अनिरुद्ध येत्या काही काळामध्ये हिंदुस्थानमध्ये त्यांचा ब्रँड लाँच करण्याची योजना आखत आहेत. त्यांनी यापूर्वी सांगितले होते की ते २०२५ मध्ये ब्रँड लाँच करण्याची योजना आखत आहेत, परंतु त्यांनी अद्याप लाँचबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List