हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षात आठ विमाने पाडली, मीच ते युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षात आठ विमाने पाडली, मीच ते युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नागरिकांच्या निर्घृण हत्येनंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात हिंदुस्थानने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केल्यानंतर चार दिवसांनी हे युद्ध थांबले आणि दोन्ही देशांनी युद्धबंदी जाहीर केली. त्यानंतर आपणच हे युद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. आतापर्यंत सुमारे 60 वेळा त्यांनी हा दावा केला आहे. हिंदुस्थानने अनेकदा त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षादरम्यान आठ विमाने पाडली गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सुरुवातीला या संघर्षात पाच विमाने पाडल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धोरवर धरले होते. आपली पाच विमाने पडली काय, असा सवालही करण्यात आला. मात्र, मोदी सरकारने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध आपल्या मध्यस्थीमुळेच थांबल्याचा दावा केला. तसेच या संघर्षात आठ विमाने पाडल्याचा दावाही केला आहे. आधी पाच विमाने आणि आता 8 विमाने पाडल्याचा दावा केल्याने ट्रम्प यांनी आपलाच आधीचा दावा बदलला आहे. तसेच कोसोव्हो-सर्बिया आणि काँगो-रवांडा युद्ध आपणच थांबवल्याचा दावा त्यांनी केला. हिंदुस्थानने ट्रम्प यांचा दावा नाकारला असून पाकिस्तानच्या विनंतीमुळेच युद्ध थांबवल्याचे स्पष्ट केले. मात्र, ट्रम्प पुन्हा पुन्हा तोच दावा सातत्याने करत आहेत. सुमारे 60 वेळा त्यांनी हा दावा केला असून पाडलेल्या विमानांची संख्या 8 होती, असा नवी पुष्टीही त्याला जोडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार
सोलापूरच्या अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रिलस्टार. त्यांच्या या रिअल लाईफची दखल साऊथच्या सिनेमाने घेतली आहे. या दोघांच्या...
माझ्याकडे ती फाइल आलीच नाही आणि आमच्याकडून ती परवानगी दिली गेली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी निलंबित तहसीलदारांची प्रतिक्रिया
गोलमाल है भय्या, दाल मे कुछ बडा काला है! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी सुप्रिया सुळेंना मोठा संशय
दिल्लीत जशी जशी थंडी वाढेल तसा फुफ्फुसांवर…; शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता 
विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे उज्ज्वल यश
राहुरीत भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्या विहीरीत पडले, एक जिवंत तर दुसऱ्याचा मृत्यू
Black Eggs vs White Eggs : काळं अंड विरुद्ध सफेद अंड, प्रोटीनमध्ये खरा बादशाह कोण? कुठलं अंड शरीरासाठी जास्त फायद्याचं? जाणून घ्या