अडीच कोटींचे अपहार प्रकरण, सद्गुरू रोहिदासजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षासह विश्वस्ताला अटक
केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या दोन कोटी 48 लाख रुपयांच्या अनुदानात अपहार केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे (58) आणि विश्वस्त संजय बन्सी साळवे (वय 56, दोघे रा. आलमगीर रस्ता, भिंगार) यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सहायक लेखाधिकारी संदीप हरिभाऊ देठे (वय 46) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साळवे बंधूंसह उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे, सचिव अनिल तुळशीदास शिंदे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, विश्वस्त राजू बन्सी साळवे आणि रेखा संजय साळवे (सर्व रा. भिंगार) यांच्याविरुद्ध 18 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
भिंगार येथील ‘सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान’ या संस्थेने 2016 ते 2020 या कालावधीत केंद्र शासनाकडून केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेसाठी अनुदान मिळविले होते. शासनाने संस्थेच्या खात्यावर दोन कोटी 48 लाख 21 हजार जमा केले. मात्र, अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून हा निधी शाळेसाठी न वापरता श्रद्धा एंटरप्रायजेस, सुभाष साळवे, क्षितिज शर्मा व इतर नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यावर वळविला. विशेष म्हणजे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List