ठाण्यात चार लाख मतदार वाढले, प्रत्येक प्रभागात दहा हजारांहून अधिक मतदार

ठाण्यात चार लाख मतदार वाढले, प्रत्येक प्रभागात दहा हजारांहून अधिक मतदार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे पालिका हद्दीत तब्बल 4 लाख मतदार वाढले आहेत. ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात असताना प्रारूप मतदार याद्यांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान विरोधी पक्षाकडे आहे.

महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणुकीसाठी पालिका सज्ज झाल्या आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्याने गेल्या म्हणजेच 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेने काही दिवसांपूर्वीच अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान प्रारुप मतदार याद्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्यांनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

16 लाख मतदाते

यंदाच्या निवडणुकीत एकूण 16 लाख 49 हजार 867 इतके मतदार आहेत. त्यात 8 लाख 63 हजार 878 पुरुष, 7 लाख 85 हजार 830 महिला, 158 इतर मतदार आहेत. तर, 2017 मध्ये एकूण मतदारांची संख्या 12 लाख 28 हजार 606 इतकी होती. त्यात 6 लाख 67 हजार 504 पुरुष तर 5 लाख 61 हजार 87 महिला आणि 15 इतर मतदारांचा समावेश होता. यामध्ये महिला 2 लाख तर पुरुषांच्या संख्येत 2 लाख मतदारांची भर पडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर
कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र...
मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं
तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प
100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक
डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट; निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार !
हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य
कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू