SIR प्रक्रिया जबरदस्तीनं राबवणं धोकादायक, ममतांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना सुनावलं
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहीत राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) वरून चांगलंच सुनावलं आहे. सध्याची एसआयआरची प्रक्रिया अनियोजित आणि पद्धतीने जबरदस्तीने राबवली जात आहे. ज्यामुळे नागरिक आणि अधिकारी दोघांनाही धोका निर्माण होत आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी एसआयआर प्रक्रिया चिंताजनक आणि धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, असा दावा ही केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी पत्रात काय लिहिलं?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “अधिकारी आणि नागरिकांवर ही प्रक्रिया ज्या पद्धतीने लादली जात आहे ती केवळ अनियोजित आणि गोंधळलेली नाही तर, धोकादायक देखील आहे. मूलभूत तयारी, पुरेसे नियोजन आणि स्पष्ट संवादाचा अभाव, यामुळे पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण मोहीम ठप्प झाली आहे”
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की पश्चिम बंगालचे निवडणूक अधिकारी एसआयआरमध्ये काम करणाऱ्या बीएलओंना धमकावत आहेत आणि विनाकारण कारणे दाखवा नोटीस बजावत आहेत. ममता बॅनर्जी यांनी जलपाईगुडी येथील ४८ वर्षीय बीएलओ शांती मुनी एक्का यांनी असह्य दबावामुळे आत्महत्या केलं असल्याचंही आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी दावा केला की, राज्यात आतापर्यंत एसआयआरमुळे २८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List