अनगर नगरपंचायत निवडणूक, उज्ज्वला थिटे यांचे न्यायालयात अपिल
अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले आहे.
अनगर नगरपंचायतची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. भाजप व त्यांचा मित्रपक्ष असलेला अजित पवार गट यांच्यात नगराध्यक्षपदावरून युद्ध सुरू आहे. माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे व अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळे यांनी थिटे यांचा अर्ज सूचकाची सही नसल्याचे कारण देत बाद केला आहे. या निर्णयाविरुद्ध थिटे यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List