लढाऊ विमानांच्या संदर्भात रशियाचा हिंदुस्थानला नवा प्रस्ताव, अटीशर्तींचा देखील अडथळा नाही

लढाऊ विमानांच्या संदर्भात रशियाचा हिंदुस्थानला नवा प्रस्ताव, अटीशर्तींचा देखील अडथळा नाही

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी, मॉस्कोने नवी दिल्लीला एक अत्यंत महत्त्वाचा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी हवाई सामर्थ्याला नवी दिशा मिळू शकते. हिंदुस्थानचे जुने मित्र राष्ट्र अशी रशियाची ओळख आहे. हिंदुस्थानच्या भविष्यातील गरजांसाठी Su-57 स्टील्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान कोणत्याही अटीशर्तीशिवाय उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली आहे.

रशियाच्या रोस्टेक (Rostec) समूहाचे सीईओ सर्गेई चेमेझोव्ह यांनी सांगितले की, या प्रस्तावानुसार सुरुवातीला Su-57 विमाने रशियातून पुरवली जातील आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे उत्पादन हिंदुस्थानमध्ये हलवले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मॉस्को इंजिन, सेन्सर्स आणि स्टील्थसह संपूर्ण पाचव्या जनरेशनची इकोसिस्टीम खुली करण्यास तयार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची ऑफर कोणत्याही पाश्चात्य देशांना देण्यात आलेली नाही.

चेमेझोव्ह यांनी हिंदुस्थान-रशियाच्या ‘ऑल-वेदर’ भागीदारीवर जोर देत, संरक्षण उपकरणांबाबत हिंदुस्थानी बाजूने केलेली कोणतीही मागणी ‘पूर्णपणे स्वीकारार्ह’ असेल असे देखील स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, रशिया आपला सिंगल-इंजिन स्टील्थ फायटर Su-75 चेकमेट (Checkmate) देखील ऑफर करू शकतो, असे संरक्षण विश्लेषक विजांदर के ठाकूर यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, याचे स्थानिक उत्पादन स्वस्त दरात ५व्या जनरेशनच्या विमानांची गरज पूर्ण करेल आणि ब्रह्मोस प्रमाणे अब्जावधींचा निर्यात महसूलही मिळवून देईल.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या २३व्या हिंदुस्थान-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांचा दौरा अपेक्षित आहे, ज्यात या संरक्षण करारांवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामुळे हिंदुस्थानला आपले स्वतःचे सुधारित स्टील्थ लढाऊ विमाने विकसित करण्याची अभूतपूर्व संधी मिळू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्ताने दिला पाच बछड्यांना जन्म हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्ताने दिला पाच बछड्यांना जन्म
हिंदुस्थानात जन्माला आलेल्या मुखी या मादी चित्ताने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यात मुखीने बाळांना जन्म दिला....
चिप्स खाल्यानंतर काही वेळात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं?
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध, नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर
Video – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा कार्यक्रम, उद्धव ठाकरे यांचे संबोधन
Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना, रॅम्पवॉक करताना मिस जमैका स्टेजवरून पडली, रुग्णालयात दाखल
लढाऊ विमानांच्या संदर्भात रशियाचा हिंदुस्थानला नवा प्रस्ताव, अटीशर्तींचा देखील अडथळा नाही
‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री गप्प का? रोहित पवार यांचा सवाल