भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध, नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर
रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष पदावर नमिता कीर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदावर डॉ. अलिमिया परकार यांची निवड करण्यात आली आहे.
भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीकरिता नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत 2025 ते 2028 या तीन वर्षांकरिता नव्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी श्रीराम भावे,उपकार्याध्यक्ष पदावर सुनिल वणजू आणि डॉ. चंद्रशेखर केळकर, कार्यवाह पदावर धनेश रायकर, सहकार्यवाह पदावर विनय परांजपे आणि श्रीकृष्ण महादेव दळी, खजिनदार पदी नित्यानंद भुते यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विश्वस्तपदी चंद्रकांत घवाळी, विनायक हातखंबकर तर सदस्यपदी संतोष कुष्टे, संजय चव्हाण, सनातन रेडीज, नितीन मोहिते, प्रविण आंबेकर, विक्रम लाड यांची निवड करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List