अमेरिकेशी व्यापार करार करत चीनची मोठी खेळी; डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव फसला
टॅरिफच्या मुद्द्यावरून हिंदुस्थान-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. हिंदुस्थानवर विविध प्रकारे निर्बंध लादत अमेरिका दबाव टाकत आहे. तसेच अमेरिकेने हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. मात्र, अमेरिका चीनमध्ये व्यापारयुद्ध तीव्र झाले असतानाच अमेरिका चीनमध्ये व्यापार करार झाला आहे. मात्र, चीनने अमेरिकेशी व्यापार करार करत मोठी खेळी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियातील बुसान येथे भेट झाल्यावर अखेर दोन्ही देशातील व्यापार युद्ध संपले असून त्यांच्यातील तणाव निवळला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शी जिनपिंग यांचे कौतुक केले. त्यानंतर दोन्ही देशात व्यापर करार झाला. चीनने बुधवारी स्पष्ट केले की ते अमेरिकेच्या आयातीवरील, ज्यामध्ये कृषी मालाचा समावेश आहे, टॅरिफ स्थगित करेल. मात्र, इथेच त्यांनी अमेरिकेसोबत मोठी खेळी केली आहे. चीनने कृषी मालावरील शुल्क स्थगित केले असले तरीही त्यांनी अमेरिकन सोयाबीन आयातीवरील 13 टक्के टॅरिफ अजूनही कायम ठेवला आहे.
टॅरिफ कमिशनने 10 नोव्हेंबरपासून काही अमेरिकन कृषी वस्तूंवर लादलेले 15 टक्के पर्यंतचे टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टॅरिफला प्रतिसाद म्हणून लादलेला 10 टक्के टॅरिफ कायम ठेवला. अमेरिका जरी चीनबद्दल मवाळ भूमिका घेत असली तरीही चीन अमेरिकेच्या विरोधात कारवाई करताना दिसतोय. चीनवर अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावणार नसल्याचेही आता स्पष्ट आहे. त्यामुळे अमेरिका चीन व्यापार करार झाला असला तरी अमेरिकेला नेमका किती फायदा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List