KGF अभिनेते हरिश राय यांचे निधन, कर्करोगाशी सुरु होती झुंज
सिने इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड सिने इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचे गुरुवारी निधन झाले आहे. हरिश बरीच वर्ष कॅन्सरशी झुंज देत होते. ते 55 वर्षांचे होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती देत शोक व्यक्त केला.
शिवकुमार यांनी एक्सवर पोस्ट करत हरिश यांच्या अशा अचानक जाण्याने इंडस्ट्रीला मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हरिश राय थायरॉईड कॅन्सरवर उपचार घेत होते. हा कॅन्सर त्यांच्या पोटापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवत होता.
हरिश राय यांनी अनेक यादगार भूमिका केल्या आहेत. केजीएफ सिनेमातील त्यांची रॉकीच्या काकाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List