Pune News – पुण्यातील माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल; डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक
अॅमेटीनीज स्पेसची जागा हॉस्पिटलसाठी मिळवून देतो, असे आमिष दाखवून महंमदवाडी येथील डॉक्टरांची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती आशिष आल्हाट यांच्यासह चौघांवर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राची आल्हाट, अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे आणि आसिफ शेखरा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांचे महंमदवाडी परिसरात हॉस्पिटल आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत आरोपींनी ‘अॅमेटीनीज स्पेस’साठी लीज डीड, पुणे महानगरपालिकेची परवानगी व इतर कागदपत्रांची सोय करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादीत केला. त्यासाठी २४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी डॉक्टरांनी आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये ट्रान्स्फर केले. मात्र, ठरलेली जागा न मिळवून देता आणि कोणताही परतावा न करता आरोपींनी डॉक्टरांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानूसार काळेपडळ पोलिसांनी माजी नगरसेविका प्राची आल्हाट, पती आशिष आल्हाट यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. काळेपडळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List