नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा कायम; दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश देणारी मागणी हायकोर्टाने फेटाळली

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा कायम; दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश देणारी मागणी हायकोर्टाने फेटाळली

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश पेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने आज फेटाळून लावली. सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित मंत्रालयाला देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

विमानतळाच्या नावावरून भविष्यात मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात अशांतता पसरू नये यासाठी आदरणीय व प्रभावशाली लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी करत प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले की, विमानतळाच्या नामांतराचा वाद अनेक वर्षे सुरू आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाशी लोकांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता हायकोर्टाने लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला द्यावेत. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व सदर याचिका फेटाळून लावली.

न्यायालय काय म्हणाले

n संविधानाच्या कलम 226 अंतर्गत अधिकार वापरणाऱ्या न्यायालयाला राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा अधिकार नाही.

n कायदेशीर भाषेनुसार, प्रस्ताव हा केवळ हेतूची अभिव्यक्ती आहे आणि त्याचा निर्णय व्यापक नियम आणि वैधानिक तरतुदींनुसार घेतला जाऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – रोहित आर्या कुणाचा बळी? भामट्यांच्या फसव्या जाहिराती पोलीस डायरी – रोहित आर्या कुणाचा बळी? भामट्यांच्या फसव्या जाहिराती
>> प्रभाकर पवार, [email protected] शाळेतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियान गुजरातमध्ये राबवून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
उत्तन-विरार सागरी सेतूचा विस्तार जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत, नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मान्यता
केंद्रीय पथकाचा ‘रात्रीस खेळ चाले’, अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी… नुसता दिखावा
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज सहस्रचंद्रदर्शन सोहळा
जुन्नर, आंबेगाव व शिरूरमधील बिबटे गुजरातला पाठवणार; नसबंदीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्र्यांना भेटणार
पुण्यातील रस्त्यावर पुन्हा रक्ताचा सडा, भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून संपवले