ओव्याचे की जिऱ्याचे पाणी…वजन झपाट्याने कमी करण्यासाठी दोघांपैकी कोणते ठरेल फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून

ओव्याचे की जिऱ्याचे पाणी…वजन झपाट्याने कमी करण्यासाठी दोघांपैकी कोणते ठरेल फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून

आजकाल अनेक लोकं आरोग्य समस्यांवर प्रभावी आणि सोप्या उपायांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत असतात आणि त्या उपायांचा अवलंब देखील करतात. तर सोशल मीडियावर सध्या वजन कमी करण्यासाठीचे शेकडो उपाय उपलब्ध आहेत. यामध्ये जिऱ्याचे पाणी आणि ओव्याचे पाणी यांचा समावेश सर्वाधिक प्रमाणात सांगण्यात आलेला आहे. भारतीय स्वयंपाकघरात ओवा आणि जिरे हे मसाले म्हणून वापरले जातात, म्हणून प्राचीन काळापासून लोकांनी जिरे आणि ओव्याचा विविध प्रकारे आहारात समावेश करून निरोगी राहण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही मसाल्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, म्हणूनच जिऱ्याचे आणि ओव्याचे आयुर्वेदात त्यांचे विशेष फायदे सांगितले आहेत.

लोकं वजन कमी करण्यासाठी जिरे आणि ओवा यापासून बनवलेल्या पेयांचा आहारात समावेश करतात. आता प्रश्न असा आहे की वजन कमी करण्यासाठी या दोन्हीपैकी कोणते पाणी अधिक प्रभावी आहे? तर आजच्या लेखात आपण याबद्दल तज्ञांच्या सल्ल्यानुसार जाणून घेऊयात…

जिऱ्यामधील पोषक तत्व

जिरे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. त्यात प्रथिने, हेल्दी फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे अ, क आणि ई असतात. म्हणूनच जिरे हे फक्त पोटाची समस्या दूर करण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी देखील वरदान मानले जातात.

ओव्याचे घटक

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय असलेल्या ओव्यामध्ये प्रथिने, फायबर, चांगले फॅट, कार्ब्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जस्त, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे घटक असतात.

ओवा की जिरे… वजन कमी करण्यासाठी कोणते चांगले आहे?

आहारतज्ज्ञ आणि उपचारात्मक पोषणतज्ञ यांच्यानुसार जिरे आणि ओवा हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत कारण ते चयापचय वाढवतात. तज्ञांनी वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी पिणे सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे कारण ओव्याचे पाणी भूक आणि क्रेविंग्सला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. तज्ञांच्या मते, ओव्याचे पाणी वैज्ञानिकदृष्ट्या मजबूत मानले जाते. ओव्यामध्ये थायमॉल असते, जे पचनक्रिया खोलवर सक्रिय करते.

यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या वाढीमध्ये अचानक वाढ थांबते. यामुळे गोड खाण्याची तीव्र इच्छा आणि वारंवार भूक लागणे कमी होते. दुसरीकडे आपण जिऱ्याच्या पाण्याबद्दल विचार केला तर जिऱ्याचे पाणी पोटात आम्लता नियंत्रित करते म्हणून पोट फुगणे, गॅस आणि आम्लपित्त यासाठी फार उपयुक्त आहे. म्हणूनच तज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण नियंत्रणासाठी ओव्याचे पाणी सर्वोत्तम आहे.

ओव्याचे तुमच्या दिनचर्येत अशा प्रकारे करा समाविष्ट

तुम्हाला जर वजन कमी करण्याच्या दिनचर्येत ओव्याचे पाणी समाविष्ट करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही रात्रभर पाण्यात एक चमचा ओवा भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्या. यासोबतच यातील ओवा हे तुमच्या शरीराला फायबर प्रदान करते. त्यामुळे तुम्ही ओव्याचे पाणी दररोज एक महिना प्यायल्याने तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो, कारण त्यात व्हिटॅमिन सी असते. वजनही झपाट्याने कमी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर त्या नरभक्षक बिबट्याला केले ठार, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास अखेर त्या नरभक्षक बिबट्याला केले ठार, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे, जांबुत येथील रोहन बोंबे या...
एवढी घाई का? आधी मतदार यादीतील घोळ सुधारा मग निवडणूक घ्या, सुप्रिया सुळे यांची मागणी
गुहागरमध्ये मिंधे गटाला खिंडार, आंजणी ढाकरवाडीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
रत्नागिरी शहरात १ हजार ९०० दुबार मतदार, मतदानासाठी द्यावे लागणार हमीपत्र
देशात आज ब्रिटिश साम्राज्यासारखी परिस्थिती; पूर्वी ब्रिटिश राजवट होती, आता नरेंद्र मोदींची आहे – प्रियांका गांधी
जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही, गावागावात बोर्ड लावा; शेतकऱ्यांना आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला धरले धारेवर
सातारा डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे बडतर्फ