लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने उचलले टोकाचे पाऊल, नालासोपाऱ्यातील इमारतीवरून मारली उडी
नालासोपाऱ्यात ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणाऱ्या जोडप्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हे दोघेही मूळचे मुंबई आर्थर रोड परिसरात राहणारे असून सफाई कर्मचारी म्हणून ते काम करत होते. दीपक जोगडिया (35) आणि कांचन सोळंकी (35) अशी या मृतांची नावे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दीपक जोगडिया आणि कांचन सोळंकी हे दोघेही नालासोपारा पश्चिमच्या हनुमाननगर येथील ‘साई महिमा’ इमारतीमध्ये राहत होते. 2022 पासून दोघेही ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये होते. दीपक जोगडिया हा विवाहित होता. त्याला 12 वर्षांचा मुलगा आहे. मात्र पत्नीसोबत वाद झाल्याने दीपक प्रेयसी कांचनसोबत राहत होता. रविवारी रात्री दोघांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List