आरोपीला हायकोर्टाकडून दहा वर्षांनंतर जामीन, मुंबई तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण

आरोपीला हायकोर्टाकडून दहा वर्षांनंतर जामीन, मुंबई तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण

मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबूतरखाना येथे 2011 साली झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी काफील आयुब याचा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. आरोपीचा खटल्यापूर्वीचा तुरुंगवास एक दशकापेक्षा जास्त काळासाठी होता तसेच नजीकच्या काळात हा खटला पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने एक लाखाच्या जातमुचलक्यावर आयुबची सुटका केली.

13 जुलै 2011 रोजी झालेल्या स्पह्टात 21 जणांचा मृत्यू झाला तर 113 जण जखमी झाले याप्रकरणी दहशतवादविरोधी कायदा, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत आयुबवर खटला सुरू आहे. 2012 साली अटक करण्यात आल्यानंतर  विशेष मकोका ट्रायल कोर्टाने फेब्रुवारी 2022 मध्ये त्याचा जामीन अर्ज फेटाळला, त्यानंतर त्याने मे 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आयुबच्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

न्यायालयाचे निरीक्षण काय

आरोपीने खटला सुरू होण्यापूर्वीच एक दशकाहून अधिक काळ (जवळपास 13 वर्षे) कोठडीत काढली आहेत. तसेच नजीकच्या भविष्यात हा खटला पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 2021 मधील ‘के. ए. नजीब’
प्रकरणातील महत्त्वपूर्ण निर्णयाचा संदर्भ देतानाच, जलद खटल्याचा अधिकार हा संविधानातील अनुच्छेद 21 (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत एक मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले. तसेच कोणत्याही विचाराधीन आरोपीला प्रदीर्घ कालावधीसाठी अनिश्चितपणे कोठडीत ठेवणे हे विशेष कायद्यातील कठोर जामीन तरतुदी असूनही, त्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन ठरते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – रोहित आर्या कुणाचा बळी? भामट्यांच्या फसव्या जाहिराती पोलीस डायरी – रोहित आर्या कुणाचा बळी? भामट्यांच्या फसव्या जाहिराती
>> प्रभाकर पवार, [email protected] शाळेतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियान गुजरातमध्ये राबवून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
उत्तन-विरार सागरी सेतूचा विस्तार जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत, नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मान्यता
केंद्रीय पथकाचा ‘रात्रीस खेळ चाले’, अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी… नुसता दिखावा
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज सहस्रचंद्रदर्शन सोहळा
जुन्नर, आंबेगाव व शिरूरमधील बिबटे गुजरातला पाठवणार; नसबंदीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्र्यांना भेटणार
पुण्यातील रस्त्यावर पुन्हा रक्ताचा सडा, भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून संपवले