Kokan News – संगमेश्वरमध्ये वाघबारस उत्साहात साजरी; मानव-निसर्ग नात्याची जपणूक

Kokan News – संगमेश्वरमध्ये वाघबारस उत्साहात साजरी; मानव-निसर्ग नात्याची जपणूक

रानातील शेतमाल कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे सोडतात. हिंस्र प्राण्यांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर तालुक्यातील गावोगावी वाघबारस उत्साहात साजरी करण्यात आली.

तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी, शेतकऱ्यांनी निसर्गदेवतेची आराधना करून पशुधनाच्या रक्षणासाठी निसर्गाला प्रार्थना केली. या पारंपरिक सणातून निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर नात्याचे महत्त्व अधोरेखित होते. काळाच्या ओघात ही प्रथा काही ठिकाणी लोप पावत असली तरी ग्रामीण भागात ती आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते. वाघबारसच्या आदल्या दिवशी गावातील गुराखी आणि पुजारी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडी रक्कम गोळा करतात. सणाच्या दिवशी गावातील पशुधन एकत्र आणून पूजा केली जाते. मुलांना वाघाचे रूप दिले जाते, तर गुराखी आपापल्या काठ्या सजवून या पारंपरिक खेळात सहभागी होतात.

‘वाघ रे वाघ रे’ अशा आरोळ्यांमध्ये वाघाचे प्रतीक असलेल्या सजवलेल्या मुलांना गावाबाहेर पळवून लावण्याची प्रथा पार पडते. त्यानंतर ग्रामदेवता व निसर्गाला ‘गुरे चरण्यासाठी जंगलात जात आहेत, त्यांना त्रास होऊ देऊ नको’ अशी प्रार्थना केली जाते.

“या परंपरेतून मानवाचं निसर्गाशी आणि वन्यप्राण्यांशी असलेलं नातं जपलं जातं. शेतकऱ्याच्या पशुधनाचं रक्षण निसर्ग आणि ग्रामदैवत करावं, अशी भावना या सणामागे आहे.”
एकनाथ बेटकर, ग्रामस्थ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा… दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा…
थंडीत नेहमी ड्रींक घेण्याने थंडी पळून जाईल असा सल्ला दिला जात असतो. परंतू मद्यामुळे खरंच थंडी गायब होते का? की...
मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे?
हैदराबाद बस अपघात प्रकरण, राज्य मानव आयोगाने दखल घेत मागवला अहवाल
Raigad News – घाटातील साईट पट्टीचा अंदाज आला नाही, दुचाकी 100 फूट खाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू
कुलाबा कॉजवेतून 67 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, पालिकेची धडक कारवाई
India Vs SA Test Series – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंतचं कमबॅक
हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा प्रेमात, ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल….