सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही, वरुण सरदेसाई यांची सरकारवर टीका

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही, वरुण सरदेसाई यांची सरकारवर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांना त्यांच्या वांद्रे मतदारसंघात होणाऱ्या नव्या उच्च न्यायालयाच्या बांधकामाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यावरून वरुण सरदेसाई यांनी ट्विटरवरून पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

”माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात उद्या नव्या उच्च न्यायालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच ह्या गोष्टीचा अभिमान आहे पण सरकारने सगळा राज्यशिष्टाचार सोडून साधे निमंत्रण देखील आम्हाला पाठवले नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव असण्याचे तर सोडाच. या बांधकामाकरिता तब्बल 4200 करोड रुपये राज्य तिजोरीतील खर्च करणार असून, स्थानिक आमदार हासुद्धा त्याच व्यवस्थेचा एक भाग असतो, हे कदाचित सरकार विसरले असावे”, असे वरुण देसाई यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जुनी शासकीय वसाहतील नागरिकांना घरे दिलेली नाहीत

”हे नवीन उच्च न्यायालय ज्या जागेवर उभे राहणार आहे तेथे जुनी शासकीय वसाहत होती. तिकडच्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देतो असा GR गेल्यावर्षी या सरकारने काढून घरे रिकामी करून घेतली पण अजून त्यांना वांद्र्यात प्लॉट देखील दिलेला नाही. याच जागेवर असलेल्या गौतम नगर येथील सगळ्या रहिवाशांना अजून घरे दिली नाहीत आणि भाडे पण दिले नाही”, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही

”मागे माझ्या मतदारसंघात MMRDA चे कार्यक्रम असताना असेच निमंत्रण दिले नव्हते. आवाज उचलल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. केवळ निवडून आलेला आमदार विरोधी पक्षाचा आहे म्हणून हे केले जात आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने एवढेच लक्षात घ्यावे की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही”, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात