शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले जाते. देवाजवळ नेहमी तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जातं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तसेच घरातील वातावरणही प्रसन्न राहते. पण तुम्हाला माहितीये का की,तुपाचा दिवा लावल्याने फक्त आध्यात्माच्या दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे असते.
तुपाने दिवा आरोग्यासाठी फायदेशीर
जेव्हा देशी गाईच्या शुद्ध तुपाने दिवा लावला जातो तेव्हा तो फक्त देवाच्या उपासनेचे माध्यम बनत नाही तर आजूबाजूच्या वातावरणाला देखील शुद्ध करतो. तुपाच्या दिव्याने मनाला शांतता लाभते. देशी गाईच्या शुद्ध तुपाने दिवा लावण्याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात हे जाणून घेऊया.
तुपाच्या दिवा जीवनात सकारात्मकता आणतो
आयुर्वेदानुसार तुपाचा दिवा जीवनात सकारात्मकता आणि अध्यात्म पसरवण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून देखील काम करतो. यामुळे आरोग्याला फायदे मिळतात. शुद्ध देशी गायीच्या तुपाने लावलेला दिवा शरीर, मन आणि आत्म्यासाठी फायदेशीर असतो.
तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तसेच देवाजवळ किंवा तुळशी जवळ तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने केवळ प्रकाशच पसरत नाही तर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.तेलाचा दिवा विझल्यानंतर अर्धा तास त्याचा प्रभाव राहतो, तर तुपाचा दिवा विझल्यानंतर चार तास सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो असे म्हटले जाते.
तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो
तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. पारंपारिक परंपरेनुसार जिथे दररोज तुपाचा दिवा लावला जातो तिथे अंधार, गरिबी आणि नकारात्मकता कधीच टिकत नाही. जळणारा तुपाचा दिवा हा चुंबकासारखा असतो तो नेहमी दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते.
या दिव्याचा एक मोठा फायदा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे वातावरण शुद्ध करण्याची त्याची क्षमता. वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा तुपाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याचा धूर हानिकारक जंतू आणि कण नष्ट करतो. हा धूर घरातील हवा शुद्ध आणि जंतूमुक्त करण्यास मदत करतो.
तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती असते
हा दिवा तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतो. तो शरीराचे आजारांपासून संरक्षण करतो. आयुर्वेदानुसार, तुपात त्वचेचे आजार बरे करण्याची शक्ती आहे. लवंगाने दिवा जाळल्याने हा परिणाम आणखी वाढतो. यामुळे श्वसनाच्या समस्या, त्वचेची अॅलर्जी, ताणतणाव आणि इतर अनेक आजारांपासून आराम मिळतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List