कच्च्या तेलाच्या उत्पादनाला ब्रेक लागणार! आठ देशांच्या निर्णयाचा हिंदुस्थानवर थेट परिणाम

कच्च्या तेलाच्या उत्पादनाला ब्रेक लागणार! आठ देशांच्या निर्णयाचा हिंदुस्थानवर थेट परिणाम

पेट्रोल, डिझेलच्या किमती येत्या काळात चिंता वाढवणार आहेत. जगातील 22 प्रभावशाली तेल उत्पादक देशांच्या समूहाने म्हणजेच ‘ओपेक’ने असे पाऊल उचललेय, ज्याचा परिणाम थेट हिंदुस्थानावर होऊ शकतो. नुकत्याच बैठकीत रशियासह आठ प्रमुख देशांनी 2026 च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन वाढीच्या वेगाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा टाईट राहील. याचा अर्थ किमती वाढतील. कच्चे तेल महागले म्हणजे हिंदुस्थानात महागाई वाढेल. त्यामुळे ‘ओपेक’चा निर्णय हिंदुस्थानसाठी चिंताजनक आहे.

‘ओपेक’ हे जगातील कच्च्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार देशांची प्रभावशाली युती आहे. जागतिक कच्च्या तेलाचा बाजार स्थिर ठेवणे आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘ओपेक’ देशांनी ठरवलेय की, ते डिसेंबरमध्ये दररोज 1,37,000 बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवतील. ही वाढ छोटी आहे. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची गती थांबवली जाईल. ‘ओपेक’ने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. या बैठकीत आठ देशांनी भाग घेतला.

आयात खर्च वाढवणार

तेल उत्पादन वाढीवर ब्रेक लावण्याचा अर्थ असा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. हिंदुस्थान आपल्या गरजेच्या 85 टक्क्यांहून अधिक तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाच्या उच्च किमतींचा थेट परिणाम देशातील पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर होईल. यामुळे महागाई वाढेल. कच्च्या तेलासाठी अधिक पैसे द्यावे लागल्याने हिंदुस्थानचा आयात खर्च वाढेल. यामुळे डॉलरचा साठा कमी होईल. डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे आपला रुपया कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे आयात आणखी महाग होईल.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची मागणी आणि पुरवठा याबाबत सतत चर्चा होत असताना व बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार दिसत असताना हा निर्णय आला आहे. ‘ओपेक’ देशांचे हे पाऊल जागतिक तेल बाजारावर परिणाम करू शकते.

तज्ञांच्या मते, जर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती जास्त राहिल्या आणि मागणी मजबूत झाली, तर रशियासारखे देश हिंदुस्थानाला देत असलेली सवलत कमी करू शकतात. यामुळे देशात कच्च्या तेलाची आयात आणखी महाग होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात