देशातील एक टक्का श्रीमंतांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत असलेल्या केवळ एक टक्का श्रीमंत लोकांच्या संपत्तीत तब्बल 62 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ स्टिग्लिटज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अहवालात जागतिक असमानतेचे संकट निर्माण झाले आहे, असे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘जी-20’ अध्यक्षतेमध्ये जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
जागतिक स्तरावरील टॉपच्या एक टक्का श्रीमंत लोकांनी 2000 ते 2024 यादरम्यान सर्व नवीन संपत्तीतील 41 टक्के भाग मिळवला आहे, तर खालील अर्ध्या भागातील लोकांना केवळ एक टक्का भाग मिळवता आला. या समितीत अर्थशास्त्रज्ञ जयती घोष, विनी बयानिमा आणि इमरान वालोदिया यांचा समावेश आहे. देशात असमानता प्रचंड वाढली आहे. हिंदुस्थानात आघाडीच्या एक टक्का लोकांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली आहे, तर हाच चीनमधीला आकडा पाहिल्यास तेथे 54 टक्क्यांनी लोकांची संपत्ती वाढली आहे. 2.3 अब्ज लोक सध्या मध्यम किंवा गंभीर खाद्य असुरक्षेचा सामना करत आहेत. 2019 च्या तुलनेत हा आकडा 33.5 कोटी अधिक आहे. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आरोग्य सेवेपासून वंचित आहे. 1.3 अब्ज लोकांकडे आरोग्यावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, असेही या अहवालात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List