भाजपच्या महिला नेत्याकडून मुली पुरवण्याचे काम, दैनिक भास्करच्या स्टिंग ऑपरशेनमधून भंडाफोड
भाजपची एक महिला नेता मुली पुरवण्याचे काम करते. दैनिक भास्करच्या एका स्टिंग ऑपरेशनमधून ही धककादायक बाब समोर आली आहे. माझी मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे असा दावाही या महिला नेत्याने केला आहे.
दैनिक भास्करने केलेल्या स्टिंग ऑपरेशननुसार झारखंडमधीन भाजप नेत्या फूल जोशी मुली पुरवण्याचे काम करतात. त्यांच्याकडे पक्षाचे प्रदेश मंत्रीपद आहे. दैनिक भास्करच्या पत्रकारांनी माग काढला तेव्हा याचे धागे दोरे झारखंडमध्ये सापडले. यासाठी बिहारमधील एका मुलींच्या हॉस्टेलमधली वॉर्डनही फूल जोशीला मदत करत होती. जर मुली आल्या तर त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवले जाईल जेणेकरून कुठलीही अडचण होणार नाही असे या महिलेने सांगितले. फूल जोशीने आपली ओळख बड्या नेत्यांशी आणि आमदारांशी असल्याचा दावा केला. आपल्याला कुणीही प्रश्न विचारत नाही असेही फूल जोशीने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List