उत्तन-विरार सागरी सेतूचा विस्तार जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत, नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मान्यता

उत्तन-विरार सागरी सेतूचा विस्तार जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत, नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मान्यता

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे 66 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रिंग रोड उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसह नाशिक, पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्याने ही  वाहतूककोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉइंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर-दक्षिण जोडणी करत 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केली.

 उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12  किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात  9.32  किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून ऑरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन-विरार सागरी सेतू आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

विरारअलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेसाठी भूसंपादन

विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देण्यास आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या...
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात
10 रुपयांची सेफ्टी पिन आता 69 हजारांना मिळणार! जाणून घ्या कारण…
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने उचलले टोकाचे पाऊल, नालासोपाऱ्यातील इमारतीवरून मारली उडी
आईच्या कुशीतून चोरलेले बाळ सहा तासांत आईच्या कुशीत, अपहरणकर्त्यासह आत्यावर पोलिसांची झडप
देव तारी त्याला कोण मारी ठाण्यातील थरारक घटना, विद्यार्थ्यांना उतरवले आणि स्कूल बस पेटली