मशीनवर काम करताना अल्पवयीन कामगाराच्या हाताचा पंजा तुटला, भोसरीतील घटना
सुरक्षा साधनांशिवाय प्रेस मशीनवर काम करताना एका अल्पवयीन कामगाराचा हात प्रेसमध्ये अडकल्याने चार बोटे व तळहात तुटला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे ए-वन इंजिनिअरिंग कंपनीत घडली.
बालाजी आलुरे (वय 45, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन कामगाराने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीचे सुपरवायझर आरोपी आलुरे याने फिर्यादीला कोणतीही सुरक्षा साधने न देता आणि प्रशिक्षणाशिवाय प्रेस मशीनवर कामाला लावले. काम सुरू असताना मशीनचे डाय अचानक खाली आल्याने फिर्यादीचा हात मशीनमध्ये अडकला आणि चारही बोटे आणि तळहात तुटून गंभीर दुखापत झाली. पोलीस हवालदार रोकडे तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List