जुन्या वादातून महाविद्यालयीन तरूणीवर भररस्त्यात अॅसिड हल्ला, आरोपी फरार
जुन्या वादाचा राग मनात धरून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात अॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली. तरुणीने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने तिचा चेहरा बचावला, मात्र तिच्या हातावर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. नागरिकांनी तरुणीला तात्काळ रुग्णालयात नेले. घटनेचाी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र तिचा पाठलाग करायचा. एक महिन्यापूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. याच रागातून आरोपीने हे कृत्य केले. पीडिता रविवारी सकाळी दिल्लीतील अशोक विहार स्थित लक्ष्मीबाई महाविद्यालयात चालली होती. तरुणी कॉलेजला जात असतानाच आरोपी जितेंद्र त्याचे दोन साथीदार ईशान आणि अरमानसह बाईकवरून आला आणि त्याने तरुणीला वाटेतच अडवले.
ईशानने अरमानकडे अॅसिडची बाटली दिली. तरुणीवर अॅसिड फेकताच तिने चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या हातावर जखमा झाल्या. नागरिकांनी सतर्कता दाखवत तात्काळ तरुणीला रुग्णालयात नेले. हल्ल्यानंतर आरोपींनी पलायन केले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List