टायर फुटल्याने धावती एसी बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 40 प्रवासी थोडक्यात बचावले
कुरनूल, रांची येथील बसला आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच आता लखनौमध्ये एसी बसमध्ये अग्नीतांडव पहायला मिळाला. टायर फुटल्याने धावत्या बसला भीषण आग लागली. यात बस संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
लखनऊमधील आग्रा एक्सप्रेस वेवर काकोरीमध्ये रविवारी पहाटे 4.45 वाजता ही घटना घडली. एसी बसचा टायर अचानक फुटला आणि भीषण आग लागली. काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अपघातावेळी बसमध्ये 40 प्रवासी होते आणि ते सर्वजण थोडक्यात बचावले.
बस चालकाने आग पाहून ताबडतोब बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. सदर बस दिल्लीहून गोंडा येथे जात होती. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List