दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी

दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी

एकीकडे पुणे बाजार समितीमधील बेकायदा टपर्‍या, स्टॉल काढण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिवेशनात केली. मात्र, दिवाळीच्या सुट्टीत मार्केटयार्डात पुन्हा नव्याने दोन टपर्‍या पडल्या आहेत. वाहतुकीला अडचणी होतील अशा ठिकाणी टपर्‍या टाकल्याने बाजारात दररोज कोंडी होऊ लागली आहे. मात्र, याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे.

चार वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांच्या काळात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या आणि बेकायदेशीर टपर्‍या हटविल्या होत्या. बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून फळे भाजीपाला, गुळ भुसार विभागात टपर्‍या पडत आहेत. दोन आठवड्यापुर्वी फळे भाजीपाला विभागात जय शारदा गजानन गणपती मंडळासमोर एक भली मोठी टपरी पडली होती. आता त्या टपरीलगत आणखी मोठी टपरी थाटली आहे. या टपर्‍यांचा पसारा अर्ध्या रस्त्यात आला आहे. यामुळे बाजारात शेतमालाची ने आण करणार्‍या वाहनांना अडथळा होत आहे. तर, शेतमाल ने आण करताना कामागारांना त्रास होतो. या सर्व अडचणींमुळे परिणाम शेतमालावर होतो आणि शेतकर्‍यांचे नुकसान होत असाताना बाजार समितीचे सचिव याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

सुरक्षा अधिकार्‍यांचे खिसे गरमागरम

यापुर्वी टपरी काढण्याचे आदेश कर्मचारी अधिकारी यांना दिल्याचे बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यंनी सांगितले होते. मात्र, टपरी हटविण्याऐवजी नविन टपरी पडली. सचिवांचे एकीकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षा विभागातील अधिकार्‍यांचे खिसे गरम झाल्यामुळे नवनविन टपर्‍या पडू लागल्याची चर्चा बाजार समितीत आहे. यावर सध्या तरी बाजार समिती प्रशासनाने प्रतिक्रया देणे टाळले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;