Jamkhed News – स्कूटीच्या डिक्कीतून तीन लाख लांबविले, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Jamkhed News – स्कूटीच्या डिक्कीतून तीन लाख लांबविले, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेले तीन लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना जामखेड येथे घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

ही  घटना शुक्रवार दि 10 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अभय अशोक शिंगवी, (47), हे शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक जामखेड येथे गेले व त्यांनी चेक द्वारे साडेतीन लाख रुपये काढले. त्या मधिल पन्नास हजार रुपये खिशात ठेवले व उर्वरित तीन लाख रुपये स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. यानंतर फिर्यादी शिंगवी हे आपल्या जयहिंद चौक येथील चष्म्याच्या दुकानासमोर आले. यावेळी दुकानात गिर्‍हाईक असल्याने ते गाडी दुकानासमोर लाऊन दुकानात गेले. गिर्‍हाईक झाल्यावर लगेचच ते काढलेले पैसे बीड रोड येथील नगर मर्चंट बँकेत भरण्यासाठी गेले. यावेळी डिक्कीत ठेवलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गाडीची डिक्की उघडली मात्र डिक्कीत पैसै आढळुन आले नाहीत. त्यामुळे डिक्कीतील पैसे चोरीला गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर शिंगवी यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. फिर्यादी अभय शिंगवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ. प्रवीण इंगळे हे करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;