पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?

पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान संतापला आहे. सलमानच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान इतका नाराज झाला की, त्यांनी त्याला दहशतवादी घोषित केले. सलमान खानच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्ताननं त्याचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या (१९९७) चौथ्या अनुसूचीत समाविष्ट केलं आहे. या यादीत दहशतवादात सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी आहे.

चौथ्या अनुसूचीत समाविष्ट होण्याचा अर्थ सलमान खानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. पाकिस्तानमधील त्याच्या हालचालींवर बंदी घातली जाऊ शकतं आणि त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. रियाधमधील जॉय फोरम २०२५ मध्ये सलमानने दिलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, जॉय फोरममध्ये हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना सलमान खानने बलुचिस्तानला एक वेगळा देश म्हणून वर्णन केलं होतं. तो म्हणाला होता, “सध्या, जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि तो येथे (सौदी अरेबियात) प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींचा व्यवसाय करेल कारण अनेक देशांमधून लोक येथे आले आहेत. बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानातील लोक आहेत, पाकिस्तानातील लोक आहेत… प्रत्येकजण येथे काम करत आहे.” त्याच्या याच वक्तव्यानंतर पाकिस्तानाने त्याला दहशतवादी घोषित केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या रात्रीच्या अंधारात विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पिंपळगाव निपाणी...
Latur News – बुधोडा येथे ट्रॅव्हल्स आणि सायकलचा भीषण अपघात, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
७ मिनिटांत ८५० कोटी रुपयांची चोरी, पॅरिसच्या लूव्र संग्रहालय प्रकरणात दोघांना अटक
मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवे यांचा सवाल
मुंबईसह कोकण परिसरात 26 ते 30 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
Bihar Election : सत्तेत आल्यास वक्फ कायदा कचराकुंडीत फेकून देऊ – तेजस्वी यादव
राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह