देशव्यापी एसआयआरच्या घोषणेची शक्यता, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
मतचोरी व मतदार यादीतील घोळावरून देशभरात वादळ उठले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग सोमवारी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशव्यापी मतदार यादी फेरछाननीची (एसआयआर) घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘पीटीआय’ने अधिकाऱयांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार एसआयआरच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रकही उद्याच जाहीर होऊ शकते. यात 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोऱया जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीसह 10 ते 15 राज्यांचा समावेश असेल.
महाराष्ट्रात एसआयआर कधी?
महाराष्ट्राच्या मतदार यादीतही अनेक घोळ आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नुकतीच निवडणूक अधिकाऱयांची भेट घेऊन यादीतील घोटाळय़ाचे पुरावे दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार यादी स्वच्छ करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातच एसआयआर होणार का, याविषयी उत्सुकता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List