नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू

नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या रात्रीच्या अंधारात विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

पिंपळगाव निपाणी शिवारात संपत उघडे यांच्या विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत रविवार सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वैभव पवार या तरुणास आढळून आला. हा बिबट्या दोन दिवसां पूर्वी भक्ष्याचा पाठलाग करत असताना मध्यरात्रीच्या वेळी विहिरीत पडला. विहिरीला सुरक्षा कठडे नसल्याने बिबट्या अंधारात खोल विहिरीत पडला.. त्याला बाहेर येण्यासाठी काहीही मार्ग दिसला नसल्याने त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. दिवसा ढवळ्या बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी लाईट असतानाही लोक घरा बाहेर पडत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;