अभिनेते सतीश शाह यांना अखेरचा निरोप

अभिनेते सतीश शाह यांना अखेरचा निरोप

किडनीच्या आजाराने निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. विलेपार्ले पश्चिम येथील पवन हंस स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टीव्ही मालिका, रंगभूमी आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सतीश शाह यांचे शनिवारी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. शाह यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. आज शाह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. टीव्हीवर त्यांच्या मुलाची भूमिका केलेले राजेश कुमार, निर्माते अशोक पंडित यांनी शाह यांच्या पार्थिवास खांदा दिला. त्यावेळी वातावरण भावूक झाले होते. सतीश शाह यांच्या सहकलाकार राहिलेल्या रुपाली गांगुली यांना अश्रू आवरता आले नाहीत.

नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, रत्ना पाठक-शाह, पंकज कपूर, सुरेश ओबेरॉय, रणजीत, स्वरूप संपत, पुनम ढिल्लन, टिकू तलसानिया, अवतार गिल, दिलीप जोशी, नील नितीन मुकेश आदी कलाकारांनी शाह यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही शाह यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची शिफारस केली आहे. तसे शिफारस पत्र सरन्यायधीशांनी कायदा मंत्रालयाकडे...
ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 
हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम घरात मृतावस्थेत आढळली, क्रीडा विश्वात खळबळ
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी वडिलांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, तीन दिवस सुरू होते अघोरी प्रकार
चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल
मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत