बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
बीडमधीस पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअप अंत्यविधी कार्यक्रमात घुसला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असून सात ते आठ जण जखमी झाले आहे. जखमींवर बीड शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पाली परिसरातील स्मशान भूमी मध्ये आज सायंकाळी स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांच्यावर अंत्यविधी सुरू होता. याच दरम्यान भरधाव वेगाने येणार्या पिकअपवरील पिकअप चालकाचे संतुलन सुटल्यामुळे हा पिकअप अंत्यविधी मध्ये घुसला. यात संभाजी विठ्ठलराव जाधव यांचा मृत्यू झाला असून मसू जगताप करचुंडी वय 45 वर्ष व आश्रुबा शिंदे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यासह आठ ते दहा जण अपघातात जखमी झाले आहेत. यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List