निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
On
राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्याच्या मुखअय निवडणूक आधिकाऱ्यांची मंगळवारी आणि बुधवारी भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत निवडणूक आयोगाशी काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर मुद्दे सांगितले आहेत.
X वर पोस्ट राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे
- निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे
- २०२४ साली ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे?
- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत.
- राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली
- जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ
- जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल
- आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं… मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत?
- या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय हेच मला कळत नाहीये.
- २०२२च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय?
- या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले?
- निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
- या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे?
- २०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
16 Oct 2025 00:01:18
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
Comment List