बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली
बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे काही दिवसांपासून कैद्याच्या धर्मांतरण प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या बाबतीत तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. वरिष्ठांनी या तक्रारीची दखल घेत त्यांची आज बुधवारी उचलबांगडी केली आहे. पेट्रास गायकवाड यांची नागपूरला बदली करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी बीडला पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचे कारागृह अधीक्षक आले होते. त्यांनी कैद्यांचे धर्मांतरण केल्याचे प्रकरण समोर आले होते. याबाबत चर्चादेखील झाली होती. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर जेल परिसरात असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. यावेळीही ते वादग्रस्त ठरले होते. इतरही कारणामुळे गायकवाड चर्चेत होते. सगळ्याच प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांची उचलबांगडी करण्यात आली. नागपूर या ठिकाणी गायकवाड यांची बदली करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List