सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?

सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहित आहे. डॉक्टर स्वत: सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदात खूप पोषक तत्वे असतात. पण आपण अनेकदा पाहिलं असेल की काही लोक सालासकट तसेच सफरचदं खातात आणि काहीजण त्यावरील साल काढून फक्त आतला भाग खातात. पण यातील योग्य पद्धत कोणती आहे ती.

सफरचंद सालाशिवाय खाणे योग्य कि सालासकट?

तथापि, बरेच लोक सफरचंद सोलल्यानंतर खातात, ज्याचे कारण असते स्वच्छता आणि चव. तर काहीजणांना सफरचंदाचे सालही पोषक वाटते म्हणून ते सालासकट खातात. मग नक्की योग्य आहे आहे. तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सफरचंद सोलून तुम्हाला जास्त पोषक तत्वे मिळत नाहीत. सफरचंदाच्या गरामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, अँटी-ऑक्सिडंट्स आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, मात्र सफरचंदाच्या सालीमध्ये इतरही अनेक गुणधर्म असतात.

जर तुम्ही सालाशिवाय सफरचंद खात असाल तर….

फुफ्फुसांचे संरक्षण : सफरचंदाच्या सालीमध्ये क्वेर्सेटिन असते, जे एक दाहक-विरोधी संयुग असते जे फुफ्फुसांना अनेक आजारांपासून वाचवते.

निरोगी हृदय : सफरचंदाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

वजन कमी करण्यास मदत करते : सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवतात आणि जास्त खाण्यापासून रोखतात. जर व्यायाम आणि कॅलरीजचे प्रमाण कमी केले तर ते तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

निरोगी पचनसंस्था : सफरचंदाच्या सालींमधील फायबर घटक वजन कमी करण्यासाठी मदत करते. जे यकृताचे आरोग्य आणि हाडांच्या आरोग्यासाठी देखील योगदान देते. मधुमेहींमध्ये पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटफुगीचा त्रास असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.

जीवनसत्त्वांचा समृद्ध स्रोत : सफरचंदांमध्ये जीवनसत्त्वे अ, के आणि क भरपूर प्रमाणात असतात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असतात, ज्यामुळे ते मूत्रपिंड, हृदय, मेंदू, त्वचा आणि हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
हरिद्वार स्थित पतंजली वेलनेस लोकांना नवे आयुष्य देत आहे. मोठ्या संख्येने विविध रोगांनी आजारी असलेल्यांना नवीन आयुष्य मिळत आहे. अशा...
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार
गुजरातच्या मंत्रिमंडळातली सर्व मंत्र्यांचे राजीनामे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपुर्वी भाजपचा मोठा निर्णय
मी तर कोंबडी चोर, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी नाकारली Y दर्जाची सुरक्षा
Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस उडणार लग्नाचा बार
Video – अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे